काँग्रेस पक्षाला शरद पवारांसारखा वकील मिळाला आहे- देवेंद्र फडणवीस

Foto

ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड  घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाला आहे. ईडीने हीच गोष्ट कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता काँग्रेसने आणि गांधी कुटुंबानं याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

इटालिअन कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी जे निर्णय दिले आहेत. त्यामध्ये चार वेळा सोनिया गांधींचं नाव आलं आहे. त्यामुळे हे जे पुरावे समोर आले आहेत त्यावर काँग्रेसने उत्तर दिले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेणे हा कटाचाच भाग असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले. शरद पवारांच्या या विधानावर फडणवीस यांनी टीका केली आहे. काँग्रेस पक्षाला पवारांसारखा मोठा वकील लाभला आहे. त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker